नाशिक 25 जुलै : हिंदू धर्मात पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला 28 जुलैपासून सुरूवात होत आहे. या महिन्यात नाशिक जिल्ह्यातील धार्मिक स्थळ असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन तयारीला लागलं आहे. श्रावण महिन्यात हजारो भाविक त्रंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा (Bramhagiri Trimbkeshwar Parikrama) मारण्यासाठी येत असतात.गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे भाविकांना प्रदक्षिणेस बंदी घालण्यात आली होती.त्यामुळे या वर्षी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
श्री संत निवृत्तीनाथ महाराजांना याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला आणि भागवत धर्माची स्थापना झाल्याची अख्यायिका आहे. अशा पुराणकालापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा प्रचलीत आहे. पुण्यप्राप्तीसाठी, तर कधी पापक्षालनासाठी प्रदक्षिणा झाल्या आहेत. इतिहासात शिक्षा म्हणून प्रदक्षिणा करण्यास सांगितले आहे.
श्रावण महिन्यात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. या भाविकांच्या सोयीासाठी प्रशासनाकडून खास व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी जवळपास 300 जादा बसेसच नियोजन करण्यात आले आहे.1 ऑगस्टला पहिला सोमवार आहे.8 ऑगस्टला दुसरा सोमवार आहे.तर तिसरा सोमवार हा 15 ऑगस्टला आहे.गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे भाविकांना प्रदक्षिणा मारता आली नाहीये.त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात भाविक प्रदक्षिणेसाठी दर्शनासाठी दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनानं पूर्व तयारी केली असल्याची माहिती प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी दिली आहे.
theideasplanet.com site व page ला फाॅलो/लाईक व कमेंट्न्स करा. काळजी घ्या, सुरक्षित राहा...