द पेंटॅगॉनच्या(The Pentagon) व्हिडीओमुळं पुन्हा एकदा एलियन्स असण्याच्या चर्चांना उधाण...

पृथ्वीवरून दिसणारे मोकळे आभाळ हजारो रहस्यांनी गुंतले आहे. ते सोडवण्यासाठी वैज्ञानिक दिवस-रात्र मेहनत करत आहे. वैज्ञानिकांच्या मते पृथ्वी व्यतिरिक्त बाह्यजगातही जिवन आहे. जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनीही दावा केला असून पृथ्वीबाहेरही जिवसृष्टी असल्याचे त्यांचे मत आहे. आतापर्यंत लोकांनी अनेकवेळा आकाशात एलियन्सची तबकडी दिसल्याचा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली आहे.


UFO बद्ल पेन्टागाॅनचे म्हणने

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने "हवेत दिसणाऱ्या काही अस्पष्ट वस्तूंचे" तीन व्हीडियो प्रसिद्ध केले आहेत. हे व्हीडियो प्रथम 2007 आणि 2017 साली लीक झाले होते, त्यामुळे हे व्हीडियो खरे आहेत की नाही, याबद्दल "लोकांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्यासाठी" हे व्हीडियो प्रसिद्ध केल्याचं पेन्टागाॅनचे म्हटलं आहे. यातले दोन व्हीडियो 'न्यू यॉर्क टाईम्स' वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. तर तिसरा व्हीडियो संगीतकार टॉम डिलाँग यांच्या संस्थेने लीक केला होता.



काय आहे पेंटॅगॉन

द पेंटॅगॉन (इंग्लिश भाषा: The Pentagon) हे अमेरिकेच्या सुरक्षा संस्थेचे मुख्यालय आहे. पेंटॅगॉन राजधानी वॉशिंग्टन डी.सी.च्या जवळ व्हर्जिनिया राज्यातील अर्लिंग्टन ह्या शहरात आहे.



UFO म्हणजे नक्की काय?

UFO (Unidentified Flying Object) "फ्लाइंग सॉस" किंवा डिस्क-आकाराचे ऑब्जेक्ट म्हणून ओळखले गेले आहेत. परंतु प्रत्यक्षात, कोणत्याही उडणाऱ्या ऑब्जेक्ट - कोणत्याही आकारात - जे पृथ्वीवर घडते आणि नैसर्गिक प्रकृती किंवा मानव म्हणून सहजपणे ओळखू शकत नाही याला UFO म्हणतात.



व्हीडियो मध्ये काय दिसतं?

न्यू यॉर्क टाईम्सनुसार यातला एक व्हीडियो अमेरिकी नौदलातल्या दोन फायटर पायलट्सने बनवला आहे. या व्हीडियो मध्ये एक गोल वस्तू प्रशांत महासागराच्या वर (जवळपास 160 किमी दूर) आकाशात उडताना दिसतेय. तर इतर दोन व्हीडियो 2015 सालचे आहेत. या दोन व्हीडियो मध्ये दोन वस्तू हवेत उडताना दिसत आहेत.


लोकांमध्ये चर्चाना उधाण

लोकांना कायमच गूढ गोष्टींविषयी कुतूहल आणि आकर्षण वाटत आलं आहे आणि UFO या संकल्पनेत तर गूढ खचून भरलं आहे. आपल्या जगापेक्षा वेगळ्या जगाचं अस्तित्व, ऐलियन या सर्वांमुळे उडत्या तबकड्यांविषयी सर्वांमध्येच आकर्षण दिसून येतं, त्यामुळे लोकांमध्ये चर्चाना उधाण आले आहे.

लोकांच्या प्रतिक्रिया

theideasplanet.com site व page ला लाईक/कमॅन्ट् करा.



img