पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचं गिफ्ट! आज जन्मणाऱ्या बालकांना दिली जाणार सोन्याची अंगठी..

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७२ वा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं भाजपाकडून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे.


img

 

NEWBORN WILL GET GOLD RING: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७२ वा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं भाजपाकडून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. भाजपाकडून मोदींच्या वाढदिवसापासून ते २ ऑक्टोबरपर्यंत देशभरात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. तर तामिळनाडू भाजपाकडून आगळीवेगळी घोषणा केली आहे. तामिळनाडूत आज जन्मणाऱ्या बालकांना थेट सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. 

भाजपाच्या तामिळनाडू युनिटनं राज्यात आज जन्म घेणाऱ्या बालकांना सोन्यीच अंगठी देण्याची घोषणा केली आहे. तसंच यासोबतच मासे वाटण्याचेही जाहीर करण्यात आले आहे. राज्यात जवळपास ७२० किलो मासे वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्या आला आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी या घोषणेबद्दल माहिती देताना चेन्नईतील सरकारी RSRM रुग्णालयाची या उपक्रमासाठी निवड केली असल्याचं सांगितलं. या रुग्णालयात १७ सप्टेंबर रोजी जन्मला येणाऱ्या नवजात बालकांना २ ग्रॅम सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. त्या प्रत्येक अंगठीची किंमत ५ हजार रुपये असणार आहे. 

मुख्यमंत्री एम. के स्टालिन यांच्या विधानसभेच्या कार्यक्षेत्रात पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेतर्फे मासळी वाटली जाणार असून नागरिकांना मासे खाण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या या वाढदिवसानिमित्त भाजपकडून विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे. नरेंद्र या वाढदिवसाबरोबरच महात्मा गांधी यांची जयंतीनिमित्तही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

PM Modi birthday Tamil Nadu BJP to gift gold rings to newborns


लोकांच्या प्रतिक्रिया


theideasplanet.com site व page ला फाॅलो/लाईक व कमेंट्न्स करा. काळजी घ्या, सुरक्षित राहा...